झिका व्हायरसच्या रुग्णाबाबत काळजी करण्याचे कारण नाही - टोपे SaamTv
महाराष्ट्र

झिका व्हायरसच्या रुग्णाबाबत काळजी करण्याचे कारण नाही - टोपे

राज्यात सध्या साथीचे आजार पसरत असून आरोग्य विभाग याबाबत योग्य ती दक्षता घेत असल्याचे देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

लक्ष्मण सोळुंके

जालना : पुणे जिल्हयातील पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. याबाबत काळजी करण्याची गरज नाही. या आजाराच्या रुग्णामध्ये जी लक्षणे आढळून आली आहेत, त्यानुसार संबंधित रुग्णावर उपचार केले जात आहेत. पुरंदर तालुक्यात साठलेल्या गोड पाण्यावर एडिस डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून आवश्यक पाऊले उचलून सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

राज्यात निर्बंध हटवण्यासंदर्भात संपूर्ण गृहपाठ झाला असून टास्क फोर्स सह सर्वांची मते आलेली आहेत. याबाबत मुख्यमंत्री लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे देखील टोपे म्हणाले. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढीचा वेग कमी झाला असून दीड महिन्यांपासून राज्यात ५ ते ७ हजाराच्या दरम्यान कोरोनाबाधितांचा आकडा समोर येत आहे.

ही संख्या कमी करण्यासाठी कोरोना लसीकरण करण्याला नागरिकांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले. राज्यात सध्या साथीचे आजार पसरत असून आरोग्य विभाग याबाबत योग्य ती दक्षता घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

Maharashtra News Live Update: मालवणच्या समुद्रात पर्ससीन, हायस्पीड नौकांचा धुमाकूळ

Ladki Bahin Yojana : ₹१५०० रुपयांचा बंद झालेला हप्ता व्हॉट्सअ‍ॅपवरून सुरू होणार? लाडक्या बहिणींनो, अर्ज करण्यापूर्वी हे नक्की वाचा

४ नोव्हेंबरपूर्वी ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होणार; E-KYC करावी लागणार का? जाणून घ्या नवी अपडेट

SCROLL FOR NEXT