rajesh tope 
महाराष्ट्र

डेल्टा प्लसचे रुग्ण वाढले; आराेग्यमंत्र्यांचे जनतेस आवाहन

संजय जाधव

बुलढाणा : राज्यात पुन्हा काेविड १९ चे covid 19 डेल्टा प्लसच्या delta plus रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. सध्या राज्यात डेल्टा पल्सच्या रुग्णांची संख्या ७६ पर्यंत पाेचली आहे आहे. राज्यातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, चिंता करु नये असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे rajesh tope यांनी खामगावात नमूद केले आहे.

आरोग्यमंत्री टोपे हे खामगावच्या एका रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या एमआरआय आणि सिटीस्कॅनच्या उद्घाटनसाठी आज (मंगळवार) खामगावात आले होते. यावेळी काँग्रेसचे माजी दिलीपकुमार सानंदा यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आराेग्यमंत्री टाेपे म्हणाले राज्यात ज्या भागात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यांची आणि त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करत आहाेत. आरोग्य विभाग प्रत्येक आठवड्यास प्रत्येक जिल्ह्यात सुमराे शंभर नागरिकांची तपासणी करीत आहे. जे नागरिक बाधित आढळत आहेत त्यांचावर तातडीने उपचार करण्यात येतात.

कोरोनाचे आणि डेल्टा पल्सच्या लक्षणे तसेच उपचारांत फार काही फरक नाही. त्यामुळे काळजी करण्याचे विषय नसला तरी आपण लक्ष ठेवले पाहिजे. जर तिसरी लाट थांबवायची असेल तर नियमांचे पालन करावे लागेलच. जरी निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी नियमांचे करावे अशी मी स्वतः विनंती करताे असेही टाेपेंनी नमूद केले.

दरम्यान महाराष्ट्राने एका दिवसात नऊ लाख ३६ हजार लसीकरणाचा विक्रम स्थापित केला आहे. केंद्र सरकारने राज्यास मोठ्या प्रमाणात लस दिली तर दररोज राज्यात १५ लाखपर्यत लसीकरण करण्याची तयारी असल्याचे मंत्री टाेपेंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून ३ सदस्यीय संयुक्त चौकशी समितीची नियुक्ती

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

Ambernath Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलते अंबरनाथचं सौंदर्य, 'ही' ठिकाणं वीकेंडला पाहायलाच हवीत

Pune : पाणीटंचाईचे संकट टळले! खडकवासला धरण शंभर टक्के भरले, इतर धरणांमध्ये किती टक्के साठा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT