NCP Akola Saam TV
महाराष्ट्र

अकोला महापालिकेवर सत्ता स्थापन करायचीच; राष्ट्रवादीचा निर्धार

अॅड. जयेश गावंडे

अकोला : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या पुढाकाराने अकोला जिल्ह्यातील अनेक सरपंच अन् माजी सरपंचासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाहीर प्रवेश केला आहे.

मागील अनेक दिवसांपासून स्थानिक पातळीपर्यंत विस्तारण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात आहे. अकोल्यात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने पक्ष प्रवेळा सुरु झाल्याचं आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हंटलं. दरम्यान, आज अकोला शहरातील अनेक युवकांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला.

हे देखील पाहा -

या पक्षप्रवेश सोहळ्यात जिल्ह्यातील जऊळखेडचे सरपंच निपाणी, पळसोदचे सरपंच विजय पाटकर, विष्णू किरडे (करतवाडी), मंगेश ताडे (टाकळी), पुरुषोत्तम गीते (दिनोडा), प्रवीण थोरात (पातोंडा), निजिममुद्दीन (पंचगव्हाण), श्रद्धा काठाळे (गांधीग्राम), महादेव सोळंके (कावसा) यांच्या अनेक सरपंच आणि उपसरपंच, कार्यकर्ते तसेच माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

या दरम्यांन, राजेंद्र शिंगणेंनी जिल्ह्यातील बूथ कमिट्या सक्षम करण्याचे आवाहन केले असून अकोला महापालिका आणि जिल्हा परिषदेवर आपली सत्ता स्थापन झाली पाहिजे, तयारीला लागा, असेहि त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT