Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; शरद पवारांवर टीका करणाऱ्यास शोधून फोडा

केतकी चितळेने शरद पवार यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून चितळेचा निषेध नाेंदविला जात आहे.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर आणि त्यांच्या परिवारावर खालच्या भाषेत टीका करणा-यांना शोधा आणि फोडा अशी मोहिम सुरू करा अशी सूचना (आवाहन) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांनी (solapur) येथे कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. (sharad pawar latest marathi news)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केतकी चितळे हिने खालच्या स्तरावरील टीका केल्याने राष्ट्रवादीसह अन्य पक्षातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते यांनी चितळेचा विविध माध्यमातून निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे एनएसपीमधील कार्यकर्ते चिडले आहेत.

सोलापूरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने इथून पुढे शरद पवारांवर टीका करणाऱ्यास शोधा व फोडा अशी संदेश जिल्ह्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी शाखेस पाठविला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम म्हणाले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना आता आम्ही साेडणार नाही. जे काेणी खालच्या स्तरावर टीका करतील त्यांना शाेधून फाेडून काढणार आहाेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT