ncp youth agitation for offline exam near sant gadge baba amravati university saam tv
महाराष्ट्र

Amravati: 'या' मागणीसाठी एनसीपी, एनएसयुआय, प्रहार विद्यार्थी संघटना एकवटल्या

मागण्या मान्य हाेई पर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने (sant gadge baba amravati university) ऑनलाइन पद्धतीने परीक्षा (exam) घ्याव्यात यासाठी आज (साेमवार) राष्ट्रवादी युवक काँग्रेस (ncp youth congress), एनएसयुआय तसेच प्रहार विद्यार्थी संघटनेने विद्यापीठा समाेर ठिय्या आंदाेलन छेडले आहे. (sant gadge baba amravati university latest marathi news)

कोरोना काळात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ६० टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाइन पद्धतीने पूर्ण झाला. आता होणारी परीक्षा ऑफलाइन का? असा सवाल विद्यार्थी करु लागले आहेत. अभ्यासक्रम जर ऑनलाइन पद्धतीने पूर्ण झाला तर परीक्षा सुद्धा ऑनलाईन घेतली पाहिजे अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

या मागणीसाठी आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ समोर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व प्रहार विद्यार्थी संघटनेने आंदाेलन छेडले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असेच सुरू राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT