Lok Sabha Election 2024: NCP Sharad Chandra Pawar Party Opposes EVM and Demands To Conduct Election on Ballot Paper Saam Tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: "ईव्हीएम नकाे, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या"; शरदचंद्र पवार गट आक्रमक

Lok Sabha Election 2024 News: राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्याला विरोध दर्शवला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Lok Sabha Election 2024 News:

ईव्हीएम द्वारे नको तर बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या अशी मागणी आज (शुक्रवार) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) यांनी काेल्हापूर येथे केली. त्याबाबतचे निवेदन पदाधिका-यांनी जिल्हा प्रशासनास दिले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुका (lok sabha election 2024) या ईव्हीएम मशीनद्वारे घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सुताेवाच केले. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यावतीने कोल्हापुरात निदर्शने करण्यात आली.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यावतीने आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्याला विरोध दर्शवला. (Maharashtra News)

याबाबतचे निवेदन पदाधिका-यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ईव्हीएम बाबत तक्रारी वाढत असून निवडणुका बॅलेट पेपर वरतीच घ्याव्यात अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचे शहराध्यक्ष आर. के. पवार यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT