ncp protests in pandharpur saam tv
महाराष्ट्र

मागणी मान्य न झाल्यास 'मविआ' च्या मंत्र्यास जिल्ह्यात फिरु देणार नाही; NCP नेत्याचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देखील आज आंदाेलन करण्यात आले.

भारत नागणे

पंढरपूर : उजनी धरणातून (ujani dam) इंदापूर (indapur) तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला पाणी देण्यास सोलापूर (solapur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. दरम्यान इंदापूरला पाणी देऊ नये या शेतक-यांच्या भुमिकेस मनसे (mns) पाठाेपाठ आता राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील पाठींबा देत आज (रविवार) पंढरपुरात (pandharpur) आंदाेलन केले. (ncp latest marathi news)

या निर्णया विराेधात राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी आज पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत ही योजना रद्द केली जाणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या एकाही मंत्र्याला सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा घाटणेकर यांनी येथे दिला.

संजय पाटील घाटणेकर म्हणाले उजनी धरणातून इंदापूर बारामती तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी दोन टीएमसी पाणी मंजूर केले आहे. तिकडेच या योजनेसाठी सुमारे ३४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही योजना रद्द करावी अशी शेतक-यांची मागणी आहे. त्यास आमचा पाठींबा आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT