Internal conflict intensifies in NCP as leaders trade allegations over control and authority after Ajit Pawar’s demise Saam Tv
महाराष्ट्र

NCPवर कब्जा मिळवण्यासाठी काळी जादू? 'पटेलांचे अधिकार वाढवण्यासाठी घटनेत बदल'

अजित पवारांच्या मृत्यूनंतर अवघ्या 18 दिवसात राष्ट्रवादीवर कब्जा मिळवण्याच्या हालचाली सुरु झाल्याचा आरोप करण्यात आलाय.. पटेल आणि तटकरेंनी पक्षाच्या घटनेत बदल केलाय का? त्याबाबत सुनेत्रा पवारांनी कोणता लेटरबॉम्ब टाकलाय..पाहूयात....

Bharat Mohalkar

ऐकलंत... अजित पवारांच्या विमान अपघातानंतर आता राष्ट्रवादीतल्या अधिकारांवरून संघर्ष सुरू झाल्याचं पुढं आलंय. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीवर कब्जा मिळवण्याचा डाव आखल्याचा मोठा आरोप रोहित पवारांनी केलाय... रोहित पवारांच्या याच दाव्याला दुजोरा देणारं आणि राज्यात खळबळ उडवणारं सुनेत्रा पवारांचं पत्र समोर आलंय.. हे पत्र सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला लिहिलंय..या पत्रातला एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 28 जानेवारीनंतर ते या पत्राच्या दिनांकापर्यंत कोणत्या व्यक्तीने पक्षाच्या वतीने केलेला पत्रव्यवहार रद्द ठरवावा

मात्र सुनेत्रा पवारांनी हे पत्र का लिहिलं... याविषयी चर्चा सुरु असतानाच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र समोर आलंय.. याच पत्रात पटेलांचे अधिकार वाढवण्यात आलेत... ते नेमके कसे..पाहूयात...

राष्ट्रवादीत पटेलांचे अधिकार वाढले?

कलम 21.1

घटनेनुसार पक्षाच्या दैनंदिन आणि प्रशासकीय कामाची जबाबदारी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची असणार

कलम 23.2

राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्षांना कार्यकारी समितीवर 10 निमंत्रित सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार

कलम 23.4

राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्ष कोणत्याही राज्यातून कोणालाही सक्रीय सदस्य म्हणून नियुक्त करू शकतात

कलम 23.5 A

राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्षांना खजिनदाराची नियुक्तीचे अधिकार

कलम 23.5 B

राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्षांना कार्यकारी समितीतून राष्ट्रीय सरचिटणीसच्या नियुक्तीचे अधिकार

एका बाजूला पक्षातल्या अधिकारांवरून लेटर वॉर सुरू असतानाच रोहित पवारांनी पटेल आणि तटकरेंवर थेट काळी जादू केल्य़ाचाच आरोप केलाय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असताना पटेल आणि तटकरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता... मात्र आता खुद्द राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांचंच पत्र समोर आल्यानं खरंच पटेल आणि तटकरेंकडून पक्षावर कब्जा मिळवण्याचा डाव उधळून लावलाय का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT