Solapur Police विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

तक्रार दाखल करायला आलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला पोलिसाकडून शिवीगाळ

सोलापूरात पोलिसांकडे तक्रार घेऊन आलेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ झाल्याची घटना घडली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरात (Solapur) पोलिसांकडे तक्रार घेऊन आलेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी पोलिस स्टेशनमध्ये (Pangri Police Station) हा प्रकार घडला असून तक्रार देण्यासाठी गेलेल्या नवाज सलीम मुलाणी या तक्रारदाराला पोलिसांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळकेल्याचा आरोप तक्रारदाराने पोलिसांवर केला आहे.

नवाज सलीम मुलाणी हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (NCP) पदाधिकारी आहे. तर शिवीगाळ करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव तावसकर असे आहे. काल सायंकाळी ४ वाजता नवाज मुलाणी हा पांगरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेला होता मात्र, पोलिस स्टेशनमध्ये कोणीही नसल्याने मुलाणी याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोन केला.

फोन केल्यानंतर दोन तासांनी पोलिस कर्मचारी तिथे आले आणि त्यानंतर त्याने आपणाला शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारदार नवाज मुलाणी याने केला आहे. दरम्यान, पोलिसांनी (Police) शिवीगाळ करतानाची सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे. जर सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल असा सवाल नवाज मुलाणी याने उपस्थित केला आहे.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT