Supriya Sule saam tv
महाराष्ट्र

Supriya Sule: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर सर्व घराणेशाहीतील नेते; खासदार सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र

Supriya Sule on PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर बसलेले सगळेच घराणेशाहीतले, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रतिउत्तर दिलं आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Supriya Sule News:

'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर बसलेले सगळेच घराणेशाहीतले, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रतिउत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौऱ्यावर असताना महाराष्ट्रातील घराणेशाही मोडीत काढली, असं मोदी यांनी म्हटलं होतं. (Latest Marathi News)

मोदींच्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रतिउत्तर देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वाक्याचा उल्लेख करत एक बोट तुम्ही दाखवला तीन बोट तुमच्याकडे असतील. त्यामुळं मोदींच्या व्यासपीठावर बसलेले सगळेच घराणेशाहीतले आहेत, असं सुळे यांनी म्हटलं आहे.

निकाल इंग्रजीतून का वाचला? : सुप्रिया सुळे

यावेळी सुप्रिया सुळे यांनी शिवसेना आमदार अपात्रता निकालावरूनही टीका केली. 'शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल हा मराठीत न वाचता इंग्रजीत का वाचला, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं ही ऑर्डर दुसऱ्यानेच लिहिली असून विधानसभा अध्यक्षांनी ती फक्त वाचली, अशी चर्चा असल्याचं सुळे यांनी म्हंटल आहे.

भाजपकडून गलिच्छ राजकारण : सुळे

'आमच्याकडे लोकशाही आहे, दडपशाही ते करतात. राज्यातील इतर प्रश्नांना दुर्लक्ष करून उगाच उद्धव ठाकरेंना लक्ष करून काय निष्पन्न होणार आहे. ईडी सारख्या संस्थांचा वापर करून जे काही पक्ष फोडले ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. सध्या भाजपकडून गलिच्छ राजकारण सुरु आहे, असा आरोप सुळे यांनी केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घाटी रुग्णालयातील प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे प्रतिक्रिया

घाटी रुग्णालयातील दोन गटांमधये तुफान झाल्याची घटना घडली. या घाटी प्रकरणार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. 'घडलेली घटना चुकीची आहे. मी उद्या उपमुख्यमंत्री यांची वेळ घेणार आहे आणि संपूर्ण घटना सांगणार आहे. त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. डॉक्टरांवर हल्ला निंदनीय आहे. गृहमंत्रालयाच्या निष्काळजीपणामुळे हे होत आहे. उद्या मी हसन मुश्रीफ आणि फडणवीस यांची वेळ मागणार आहे. महिला आणि डॉक्टर सुरक्षितताबद्दल प्रश्न विचारणार आहे. हे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे, फक्त कार्यक्रमात व्यग्र असतं, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT