Maharashtra News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'मी पक्ष बदलला म्हणून..', प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

Maharashtra News : आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार चिखलीकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाणांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला आहे. “मी कोणाला घाबरून पक्ष बदलला नाही” या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Alisha Khedekar

  • नांदेडमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा अशोक चव्हाणांवर अप्रत्यक्ष हल्ला.

  • “मी कोणाला घाबरून पक्ष बदलला नाही” चिखलीकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत वाद वाढण्याची शक्यता

  • चिखलीकरांच्या वक्तव्यामुळे नांदेडचे राजकीय वातावरण तापले आहे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीच्या नेत्यांमध्ये युद्ध सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची खासदार अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "मी पक्ष बदलला म्हणून दुसऱ्याने देखील पक्ष बदलला. परंतु मी कोणाला घाबरून पक्ष बदलला नाही. "असे त्यांनी नाव न घेत अशोक चव्हाण यांना म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. अशातच नांदेडच्या अर्धापूर येथे राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कोणाचंही नाव न घेता थेट भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर शाब्दिक घणाघात केला आहे.

या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, " मी परिस्थितीने लहान कार्यकर्ता असलो तरी स्वाभिमानी आहे. कधी कोणापुढे झुकलो नाही, आणि या पुढे आयुष्यात कधी झुकणार नाही. मी आतापर्यंत १८ निवडणुका लढवल्या आणि त्यापैकी १६ निवडणुका जिंकल्या आहेत. मागच्या दाराने कधीच गेलो नाही" असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले," माझे वडील काही मंत्री नव्हते, ना खासदार नव्हते, मागच्या दारातुन जायला. आजपर्यंत मी ज्या काही आहे त्या निवडणूका जनतेसमोर लढल्या आणि जिंकल्या आहेत." असा टोला मागच्या दाराने राज्यसभेवर गेलेले खासदार अशोक चव्हाण यांना प्रताप पाटील चिखलीकरांनी लगावला. दरम्यान चिखलीकर यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवं वादळ येणार का ? तसेच याचे पाडसाद येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT