ncp political news  Saam tv
महाराष्ट्र

सुनेत्रा पवारांचे 22 आमदार पवारांच्या संपर्कात? पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत काय ठरलं? VIDEO

ncp political news : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला अखेर ब्रेक लागलाय... तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झालीय. ते 22 आमदार नेमके कोण आहेत? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा का मागे पडला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. त्यावेळी स्वत: शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं, असा गोप्यस्फोट केला होता... मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि याच बैठकीत विलिनीकरणाचा विषय संपल्याची ठोस भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतलीय...

मात्र विलिनीकरणासाठी आग्रही असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं विलिनीकरणाच्या चर्चांना ब्रेक का लावला? पाहूयात...

अजितदादांच्या पक्षातील 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... राष्ट्रवादीच्या बैठकीत या 22 आमदारांच्या घरवापसीवर चर्चा झाल्याचं बोललं जातयं...शरद पवारांच्या संपर्कातील आमदारांनी घरवापसीला तयारी दर्शवल्यानेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शरद पवारांनी भेट घेतल्याची चर्चा आहे...दादांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदाच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात भाजपात जाण्यास विरोध असलेले आमदार शरद पवारांसोबत येऊ शकतात अशी चर्चा आहे.

त्यामुळे आता वहिनींच्या पक्षाचे आमदार आल्यास त्याबाबत विचार करू असं सूचक विधान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलंय. तर एकाही आमदारानं पवारांची भेट घेतली नसल्याचा दावा अजितदादांच्या राष्ट्रवादीनं केलाय.

गेल्या काही दिवसात दादांच्या राष्ट्रवादीत कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याची चर्चा रंगली होती... त्यात सुनेत्रा पवारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावल्यानं पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले... आता शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक लावत नवी रणनिती आखल्यानं आता 22 आमदारांची शरद पवारांच्या राष्ट्रवादी घरवापसी होते का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 League Mumbai: फायनलमध्ये मराठाची 'रॉयल' एन्ट्री; नॉर्थ मुंबई पँथर्सचा विजयरथ रोखत अंतिम फेरीत धडक

जमीन थरथरली, लोक घाबरून घराबाहेर पळाले; शहराला बसले भूकंपाचे सौम्य धक्के

पुण्यानंतर सांगलीत गोळीबाराचा थरार; बड्या नेत्याच्या नातवाची गोळ्या झाडून हत्या

पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना कर्जमाफी? सुरूवातीला 15 हजार कोटींचाच निधी?

सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीवर पक़ड घट्ट, अनावश्यक हस्तक्षेप केल्यास विचार करणार, वर्धापन दिनाला पक्षातील नेत्यांना इशारा

SCROLL FOR NEXT