अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला.. मात्र दादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन दावे-प्रतिदावे केले जात आहेत.. एवढंच नाही तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत... त्यामुळेच आता रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत 9 तारखेला मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे संकेत दिलेत..
मात्र रोहित पवार कोणत्या गोष्टींचा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे याआधीच दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं असेल तर पवारांनी एनडीएसोबत यावं, असा सल्ला दिलाय.. याच मुद्द्यावरुन राऊतांनी तटकरेंना घेरलंय..
खरंतर विधानसभेनंतरच विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरला होता.. त्यानंतर विलिनीकरणाच्या अनेक बैठका झाल्याचा दावा करण्यात येतोय.. त्यातच विलिनीकरणाच्या चर्चांना दुजोरा मिळतोय तो महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे..आता हाच धागा पकडून पवारांचं वक्तव्य म्हणजे विलिनीकरणाच्या चर्चेत तथ्य असण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य करुन शिंदेसेनेनं एकप्रकारे दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची कोंडीच केलीय..
आता शिंदेसेनेनं पवारांच्या भूमिकेशी सुसंगत घेतलेली भूमिका आणि त्यानंतर रोहित पवारांनी 9 फेब्रुवारीला विलिनीकरणाबाबत पुराव्यांसह गौप्यस्फोट करण्याबाबत केलेलं वक्तव्य... यामुळे विलिनीकरणाचा तिढा वाढणार की विलिनीकरणाला विरोध करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येऊन विलिनीकरणावर शिक्कामोर्तब होणार...याचीच उत्सुकता आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.