Conflicting statements from NCP leaders Praful Patel and Amol Kolhe intensify the political debate over party merger in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी 14 बैठका, बड्या नेत्याच्या दाव्यानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळलं

Amol Kolhe Claims 14 Meetings On NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विलिनीकरणाला थेट नकार दिलाय. तर दुसरीकडे विलिनीकरणासाठी 14 बैठका झाल्याचा दावा खासदार अमोल कोल्हेंनी केलाय. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणावर कसं राजकारण तापलयं...

Suprim Maskar

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला...मात्र या पत्रकार परिषदेला काही तास उलटले आणि दादांच्या राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेलांनी माध्यमांसमोर येत... विलिनीकरणाला स्पष्ट नकार दिला...त्यामुळे एकीकडे लेखी प्रस्ताव आल्यास विलिनीकरणाची चर्चा करू, असं विधान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलेलं असताना पटेलांच्या या नव्या भूमिकेनं एकच खळबळ उडालीये.

विलिनीकरणानंतर अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्षपद देण्यात येणार होते, असा दावा रोहीत पवारांनी केलाय. तर दुसरीकडे विलिनीकरणाबाबत झालेल्या 14 बैठकींपैकी 11 बैठकीत सहभागी होतो, असा दावा खासदार कोल्हेंनी साम टिव्हीच्या विशेष मुलाखतीत केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

विलिनीकरणाच्या चर्चेचा धुरळा उडाला असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आमदार शरद पवारांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं अशी या 12 आमदारांची इच्छा आहे. मात्र आमदारांची इच्छा असूनही दादांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांकडून सकारात्मक भूमिका घेण्याऐवजी थेट विलिनीकरणालाच नकार दिला जात आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की विलीनीकरणाच्या चर्चांना इथेच फुलस्टॉप लागणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT