NCP MERGER saam tv
महाराष्ट्र

सुप्रिया सुळे केंद्रात, जयंत पाटील, आव्हाड राज्याच्या मंत्रिमंडळात? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा फॉर्म्युला ठरला?

NCP Merger: दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेत नवा ट्विस्ट आलाय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणारचं समीकरण ठरवण्यात आलंय. नवा ट्विस्ट काय आहे? विलिनीकरणाचं काय समीकरण आहे्? पाहूयात यावरचा रिपोर्ट...

Suprim Maskar

राष्ट्रवादीचं विलिनीकरण आमच्याशिवाय होणार नाही, असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आणि विलिनीकरणाच्या चर्चेत मोठा ट्विस्ट आला. कारण दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा गाठलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापूर्वी तटकरेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केल्याची माीहिती सुत्रांनी दिलीय. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राजकीय चर्चा केली नसल्याचा दावा तटकरेंनी केलाय.

तटकरेंनी जरी मुख्यमंत्र्यांची भेट राजकीय नसल्याचं सांगितलं असलं तरी विलिनीकरणाच्या चर्चेत तटकरेंनी घेतलेल्या भेटीमुळे विलिनीकरणाबद्दलच्या राजकीय समीकरणांचीही नव्याने जुळवाजुळव सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय...त्यातच विलिनीकरणाआधी राजकीय वर्तुळात कोणते मुद्दे चर्चेत आहेत? पाहूयात...

राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले मुद्दे

खासदार सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद देण्याबाबत दोन्ही गटांचं एकमत करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा

दादांच्या राष्ट्रवादीलाही केंद्रात मंत्रिपद हवं असल्याचं बोललं जातंय

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनाही राज्य मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्या प्रस्तावाची चर्चा

आव्हाड आणि पाटलांच्या नावावर दोन्ही राष्ट्रवादींकडून सहमती होण्याची शक्यता

आव्हाड आणि जयंत पाटलांच्या नावावर भाजपश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री फडणवीस मान्यता देतात का, यावर अवलंबून असल्याची चर्चा

विलिनीकरणाची चर्चा सुरु झाल्यानंतर पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती.....त्यानंतर प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांच्या भेटीलाही गेले होते.. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेनं चांगलाच वेग आल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजितदादा आणि शरद पवारांच्या पक्षात अन्डरस्टँडिंग होतं आणि त्यामुळेच कालांतरानं अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार होते असा खळबळजनक दावा काँग्रेसनं केलाय...

एकंदरित सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्या बैठका, मंत्रिपदांच्या वाटपाबाबत रंगणाऱ्या चर्चा आणि काँग्रेस नेत्यांचे दावे या सर्व घटनांवरून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झालीय. मात्र, विलिनीकरणाच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब कधी होणार आणि भाजपश्रेष्ठींचा यावर काय निर्णय असणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबईमध्ये भव्य दिवाळी सोहळा, महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला हजारो मराठी रसिकांची उपस्थिती; अवधूत गुप्तेंच्या गाण्यांनी मैफल रंगली

Maharashtra News Live Update: नागपूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; १४३ किलो डोडा पावडरसह ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Ladki Bahin Yojana : दिवाळी संपली, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० कधी येणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत नवीन अपडेट

WhatsApp Update : व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी मोठी बातमी! आता मेसेज फक्त एकदाच पाहता येणार; जाणून घ्या कसं वापरायचं

Shirdi Sai Baba : साईचरणी 94 लाखांचं घड्याळ! 18 कॅरेट सोनं, शुद्ध चांदी

SCROLL FOR NEXT