Supriya sule and amit shah saam TV
महाराष्ट्र

अमित शहाजी, हे शिंदे गटाचे MLA मविआच्या आमदारांना खुलेआम धमकावताहेत; सुप्रिया सुळे कडाडल्या

पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टला सुरू झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. पन्नास खोके, एकदम ओके, अशा घोषणा विरोधकांनी दिल्याने विधानभवन परिसर दुमदुमून गेला. आज अधिवेशनाच्या (Monsoon Session) पाचव्या दिवशी तर सत्ताधारी आमदारांमध्ये आणि विरोधकांमध्ये राडा झाला. आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना राजकीय परिस्थितीतबाबत सांगितलं आहे. शिंदे गटातील आमदार महाविकास आघाडीच्या आमदारांना धमकावत असून त्यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. मविआच्या आमदारांना शिंदे गटातील आमदारांकडून धोका आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी आमची विनंती आहे, असं ट्विट सुळे यांनी केलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये असं म्हटलंय की, तुमच्या भारतीय जनता पक्षासोबत गठबंधन करून सरकार चालविणाऱ्या आमदारांच्या हुल्लडबाजी विरोधात कारवाई करावी. सत्ताधारी आमदारांनी केलेलं वर्तन महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाहीय. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करा. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिंदे गटातील आमदारांना कायद्याचं आणि लोकशाही मुल्यांचं प्रशिक्षण द्या, असं आवाहन सुळे यांनी अमित शहा यांना केलं आहे.

"सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या"

महाराष्ट्रातील सर्व जनता पाहत आहे, १७ तारखेपासून अधिवेशन सुरू आहे, आजपर्यंत आम्ही पायऱ्यांवर विरोधात घोषणाबाजी केली. त्या घोषणा आज सत्ताधाऱ्यांन झोंबल्या आहेत. आमच्या मागणीकडे लक्ष न देता. ५० ओके ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT