Satara, Shashikant Shinde, Koregoan saam tv
महाराष्ट्र

NCP : 'मुंबई महाराष्ट्रपासून वेगळी हाेऊ नये हीच आमची भूमिका'

निवडणुक आयाेगाने दिलेल्या निर्णयावर शिंदे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

Siddharth Latkar

Shashikant Shinde : ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष म्हणून भुमिका मांडली नव्हती. त्या त्या ठिकाणी तेथील लाेकांना बराेबर घेऊन निवडणुक लढवली. काही प्रभागात विशिष्ट लाेकांचा प्रभाव असताे. तेथे पक्ष म्हणून मतं मागितली तर प्रयाेग यशस्वी हाेत नाही. पहिल्या पासून आम्ही तेथे पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले असते तर निश्चित यशस्वी झालाे असताे असं मत आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी नमूद केले. काेरेगाव विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालावरुन विचारेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे यांनी सातारा (satara) भुमिका स्पष्ट केली. (Maharashtra News)

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले जनता बदल मागत आहे. जनतेला कळून चुकलं आहे. त्यामुळे जनता आता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. काही ठिकाणी निश्चित मी कमी पडलाे असेन. तेथे दुरुस्ती केली जाईल असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले. (Shashikant Shinde Latest Marathi News)

दरम्यान निवडणुक आयाेगाने दिलेल्या निर्णयावर शिंदे यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले केवळ चिन्हावर निर्णय हाेईल असे वाटले हाेते पण आयाेगानं पक्षाच्या नावावर देखील बंदी घातली. आमदार शशिकांत शिंदे नवी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला साथ देणार आहाेत असे सांगितलं. मुंबई महाराष्ट्रपासून वेगळी हाेऊ नये अशी आमची भूमिका असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. (Satara Latest News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT