Devendra Fadnavis And Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : 'देवेंद्र फडणवीसांना साडे चार वर्ष मुख्यमंत्री राहून...'; अजित पवारांचा अधिवेशनात गौफ्यस्फोट

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मोठा गौफ्यस्फोट केला आहे

Rashmi Puranik

Ajit Pawar News : हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कथित घोटाळ्यावरून जोरदार आरोपांच्या फैरी झडत आहे. अधिवेशनात मंत्री उदय सामंत, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संजय राठोड आणि मंत्री शंभूराज देसाई हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. याचदरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मोठा गौफ्यस्फोट केला आहे. (Latest Marathi News)

हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहात अजित पवार (Ajit Pawar) विदर्भवाद्यांच्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. अजित पवार म्हणाले, 'तुम्ही तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. श्रीहरी आणे साहेब होते. त्यांना महाधिवक्ता केले. साडे चार वर्ष मुख्यमंत्री राहायचे. त्यानंतर वेगळे विदर्भ करायचे. ही भावना त्यांच्या मनात होती. मराठी भाषिक दोन राज्य करायची होती, असा गौफ्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

राज्यात मोगलाई आहे का? अजित पवारांचा सवाल

अनिल देशमुख यांच्या जामीनावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, 'अनिल देशमुख यांना कोर्टाने जामीन दिला. अनिल देशमुख बाहेर आले तरी त्यांच्यावर त्या माजी पोलीस आयुक्तांनी आरोप केले, त्यात तथ्य नाही .अनिल देशमुख असतील, छगन भुजबळ असतील. प्रत्येकावर गुन्हा सिद्ध झाला नव्हता. तरी सहा महिने ते एक वर्ष तुरुगांत टाकले. ही कुठली मोगलाई पद्धत आहे? असा सवाल अजित पवारांनी केला.

'आयुष्यात इतके दिवस वाया गेले, कुटुंब त्रस्त झाले होते. आता काही झाले की SIT लावतात. महागाई आहे बेरोजगारी वाढली शेतकरी आत्महत्या वाढल्या तुम्ही चांगल काम आम्ही पाठिंबा देऊ, असं सांगत अजित पवारांनी राज्यातील समस्येवर बोट ठेवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT