Ajit Pawar News Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: शरद पवारांनी भाकरी फिरवल्यानंतर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Rashmi Puranik

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्र्वादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत ही मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी केलं आहे.

'आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास नवनिर्वाचीत पदाधिकारी सार्थ ठरवतील, अशा शब्दात अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया शरद पवारांच्या घोषणेवर दिली आहे. (Latest Marathi News)

आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 24 वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने दिल्लीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासहित खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

तर शरद पवारांनी केलेल्या निवडीवर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'आदरणीय शरद पवारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘ऱ्हदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र’… हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पादाधिकारी याच ध्येयाने काम करतील, हा विश्वास आहे. नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे पुन:श्च अभिनंदन'.

दरम्यान, खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे यांना पक्षात नवीन पद मिळाल्यानंतर अजित पवारांकडे कोणतं पद जातं, हे आता पाहावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT