Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: अजित पवार नॉट रिचेबल? दिवसभराचे कार्यक्रमही अचानक रद्द, पक्षाचे ७ आमदार संपर्काबाहेर, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

अजित पवार यांच्यासहित पक्षातील ७ आमदार देखील नॉट रिचेबल असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: राज्याच्या राजकारणातील एक मोठं वृत्त हाती आलं आहे. अजित पवार यांचे पुण्यातील आजचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अजित पवार आणि पक्षातील ७ आमदार देखील नॉट रिचेबल असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अजित पवार आणि पक्षाचे ७ आमदारांचे फोन नोट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार काल सकाळी पुण्यात होते. (Latest Marathi News)

अजित पवार (Ajit Pawar) हे पक्षाच्या सात आमदरांसह नॉट रिचेबल असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अजित पवार हे ७ आमदारांसह नॉट रिचेबल असल्याचं ट्विट काही नेटकऱ्यांनी केलं आहे.

अजित पवार हे कोणत्या राजकीय कारणामुळे नॉट रिचेबल झाले आहे का, अशीही चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अजित पवार आणि पक्षातील ७ आमदार नॉट रिचेबल झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

राष्ट्रवादीतील (NCP) नॉट रिचेबल झालेल्या ७ आमदारांविषयी माहिती मिळू शकलेली नाही. अजित पवार आणि ७ आमदार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत बंड केलं होतं. अशाच प्रकारचं बंड तर नव्हे ना, अशीही चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांसहित ९ एप्रिलला आयोध्याला जाणार आहेत. या दौऱ्याआधीच अजित पवार आणि ७ आमदार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. याआधी देखील अजित पवार नॉट रिचेबल झाले होते, त्यामुळे राजकारणात मोठा भूकंप होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

विधासभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली होती. त्यावेळी राजकीय खलबतांना कंटाळून अजित पवार यांनी थेट भाजपची हातमिळवणी केली होती. यावेळी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, अजित पवार आणि फडणवीस यांचं सरकार फार काळ टिकलं नाही. दरम्यान, दुसरीकडे अजित पवार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT