...तर आमचे सरकार गुंडगिरी करत नाही! - जयंत पाटील  नेत्यांना लोकांमध्ये बदनाम करणे अश्या पद्धतीचे बातम्या पेरणे हे काम भाजप करत आहे.
महाराष्ट्र

...तर आमचे सरकार गुंडगिरी करत नाही! - जयंत पाटील

नेत्यांना लोकांमध्ये बदनाम करणे अश्या पद्धतीचे बातम्या पेरणे हे काम भाजप करत आहे.

विजय पाटील

सांगली: विरोधकांना ई डी लावून नामहरण करण्याचं काम गेल्या चार पाच वर्षात भाजप पक्ष (BJP) करत आहे. हे लपून राहिलेले नाही. नेत्यांना लोकांमध्ये बदनाम करणे अश्या पद्धतीचे बातम्या पेरणे हे काम भाजप करत आहे. अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. ते सांगली मध्ये पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.

आज सांगलीमध्ये राष्ट्रवादी कार्यालय समोर भव्य असा पक्ष प्रवेश घेण्यात आला. भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. यावेळी पाटील म्हणाले, विरोधकांना ई डी लावून नामहरण करण्याचं काम गेल्या चार पाच वर्षात भाजप पक्ष करत आहे. आता खडसे आणि भुजबळ साहेबांना अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे पण ते बदनाम होणार नाहीत.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांची आपली प्रतिमा स्वछ आहे. कोणतेही गुंडगिरी कधीही झाली नाही. पोलिसांनी असे काम कधी केले नाही. सर्वाना माहिती झाले आहे. पोलीस ऐकत नाहीत कारण त्यांना माहीत आहे हे सरकार पाच वर्षे जात नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे निराशा जनक वक्तव्य अधून मधून बाहेर येतात असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राजू शेट्टी यांच्या मोर्चातील सर्व मुद्दे आम्ही नोट केले आहेत. त्यांना कोणतीही अडचण नाहीये. त्यामुळे त्यांनी मोर्चे काढण्याची गरज नाही. पुराची परिस्थिती टाळण्यासाठी आम्ही पाणी कर्नाटक ला सोडत आहे. पण राजू शेट्टी यांना नको असेल तर मी रद्द करतो. पण असे वक्तव्य हवेत करणे गरजेचे नाही. शिरोळ तालुक्यात पाणी येऊ नये यासाठी आम्ही करतोय पण राजू शेट्टी यांचा विरोध असेल तर काही हरकत नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

Train Accident: भीषण रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली; ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका, मदतीसाठी सचिनसह जुने मित्र मदतीला धावले

SCROLL FOR NEXT