Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar : ज्यांना पक्ष उमेदवारीसाठी लायक समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करून नये - पवारांचा बावनकुळेंना टोला

Sharad Pawar : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नेहमी बारामती जिंकू असल्याचं म्हणत असतात यावर शरद पवार यांनी त्यांना टोला मारला

Bharat Jadhav

Sharad Pawar Criticized chandrashekhar Bawankule :

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच बारामती जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला. त्यावर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बावनकुळे यांना टोला लगावला. चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या उमेदवारी तिकिट देण्यायोग्य नाहीत. त्यामुळे त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचे कारण नाही. त्यांना भाजपनं तिकिट नाकारलं. त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये, अशा बोचऱ्या शब्दांत शरद पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना टोला मारला. शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी हा टोला मारला. (Latest News)

५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नेहमी म्हणत असतात. याविषयी शरद पवारांना विचारलं असताना त्यांनी बावनकुळेंना टोला मारला. बारामतीचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. त्यामुळे ते वारंवार बारामतीच नाव घेत आहेत. अखंड महाराष्ट्राला आणि देशाला बारामतीचे महत्त्व माहितीये., म्हणूनच ते वारंवार बारामतीचे नाव घेतात, असा टोला पवारांनी लगावला.

कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्यानंतर भाजपकडून आंदोलन करण्यात आले. त्यादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनमानसात आणि पक्षात काय स्थान आहे, मला नाही. बावनकुळे हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं नव्हतं. ते तिकीट द्यायला सुद्धा लायक नाहीत, असा त्यांचा स्वतःचा पक्ष या व्यक्तीबद्दल बोलतो. त्यावर आपण काय भाष्य करायचे असं टोमणा शरद पवारांनी मारला. दरम्यान पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. तेथे भाजपविरोधात वातावरण आहे. देशातील ७० टक्के राज्यांमध्ये भाजप नाही. अन् जिथे या निवडणुका असून तेथे भाजपविरोधात वातावरण असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post C-section bloating: प्रसूतीनंतर पोट फुगण्याची तक्रार का वाढते? डॉक्टरांनी सांगितले समस्येचे सोपे उपाय

Maharashtra News Live Update: उद्या जेजुरी गडावर होणार सोमवती अमावस्या साजरी

Mouni Roy: दिशा पटानी अन् मौनी रॉय रिलेशनशिपमध्ये होते? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बीड पुन्हा हादरलं; कंत्राटदार तुकाराम मुंडेंचे परळीतून अपहरण, मुख्य सूत्रधार कोण?

Shocking : महाराष्ट्रातील इंजिनीयरची लंडनमध्ये आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT