Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News: …पुन्हा भाकरी फिरवण्याची वेळ आलीय; शरद पवारांचे सूचक विधान

शरद पवारांच्या या वक्त्यावमुळे राज्याच्या राजकारणात चर्चला उधाण आले आहे.

Shivani Tichkule

Sharad Pawar Big Statement: भाकरी ही फिरवावी लागते ती जर फिरवली नाही तर करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. पक्षसंघटनेत याबाबत चर्चा केली जाईल असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीने युवा मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. शरद पवारांच्या या वक्त्यावमुळे राज्याच्या राजकारणात चर्चला उधाण आले आहे. (Latest Marathi News)

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, समाजात काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. यासाठी वर्गवारी कशी करायची याचा विचार करायला हवा.

संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल, त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही, भाकरी फिरवायची वेळ आली असल्याचे शरद पवार म्हणाले. ते काम पक्षामध्ये करायचा आग्रह संघटनेतील वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं से मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्ते केले.

आयुष्याच्या उमेदीच्या काळात अनेक गोष्टींची आपल्याला माहिती आणि संधी नसते. पण निर्धार पक्का असला तर आपण अडचणींवर मात करू शकतो. त्यामुळे पक्षाला नेतृत्व तयार करण्यासाठी तरूणांपासून सुरुवात करावी लागेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी तरूणांनी विचारधारा आणि कष्ट या दोन गोष्टींचा आधार घेतला तर जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय ते थांबणार नाहीत असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT