रोहिणी खडसेंवरील हल्ल्यानंतर जळगावात राष्ट्रवादी आक्रमक Saam TV
महाराष्ट्र

रोहिणी खडसेंवरील हल्ल्यानंतर जळगावात राष्ट्रवादी आक्रमक

घोषणांनी मुक्ताईनगर पोलीस ठाणे परिसर दणाणला होता. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले.

संजय महाजन

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाली आहे. मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या नेतृत्वात खडसेंच्या निवासस्थानापासून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. पाेलिस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली तसेच संशयितांना तात्काळ अटक करा व कठोर कारवाईसाठी ठिय्या आंदोलनही करण्यात आले. घोषणांनी मुक्ताईनगर पोलीस ठाणे परिसर दणाणला होता. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले.

24 तासांचा अल्टीमेटम

हल्ला करणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली. चोवीस तासांत संशयितांना अटक करावी अन्यथा मुक्ताईनगरात महामार्गावर तसेच मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिला आहे. दरम्यान काल रात्री रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यानंतर मुक्ताईनगरमध्ये आणि संपुर्ण जळगावमध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही कडक कारवाईची मागणी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT