Abdul Sattar  Saam TV
महाराष्ट्र

Abdul Sattar News: कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा अधिकाऱ्यांवर दबाव; राष्ट्रवादी, भाजपच्या आमदाराचा गंभीर आरोप

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर राष्ट्रवादी व भाजपच्या आमदाराचा गंभीर आरोप केला आहे.

संदीप नागरे

Hingoli News : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर राष्ट्रवादी व भाजपच्या आमदाराचा गंभीर आरोप केला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह त्यांचे विशेष कार्य अधिकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. सत्तार यांच्यावरील आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात विविध विकास कामांची कोट्यवधी रुपयांची रुपयांची देयके आणि कामे नियमबाह्य पद्धतीने रोखण्याचे अधिकाऱ्यांना तोंडी आदेश देण्यात आले आहेत. कंत्राटदाराची देयके का रोखण्यात आली याचे उत्तर मिळेना झाले आहे. जिल्हा परिषद कार्यालयात दोन कंत्राटदार व एका कर्मचाऱ्यांची एकमेकांसोबत हाणामारी देखील झाली.

तर राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे व भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी पालकमंत्री चे स्वीय सहाय्यक यांनी मनमानी करून नियमबाह्य पद्धतीने देयके आणि कामे रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगत असल्याचा आरोप केला आहे .

आज या सर्व प्रकारावरून जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खडा जंगी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कृषिमंत्री व हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सूचनेवरून त्यांचे विशेष कार्य अधिकारी हे हिंगोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याच्या आरोप करण्यात येत आहे.

भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी केंद्रे यांना फोन करून जाब विचारला. तसेच जिल्ह्यातील विकास कामे न थांबवता कंत्राटदाराची देयके तातडीने अदा करण्यास सांगितले आहे. दरम्यान, सत्तार यांच्यावरील आरोपानंतर त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT