Amol Mitkari Nagpur Toilet Video Saam Tv
महाराष्ट्र

Amol Mitkari : चक्क शौचालयात धुतल्या जाताहेत आमदारांच्या कपबशा?, मिटकरींनी VIDEO केला ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवासातील व्हीडिओ ट्वीट केला आहे.

Satish Daud

Amol Mitkari Nagpur Toilet Video : सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात अनेक राजकीय पक्षांकडून विविध मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवासातील व्हीडिओ ट्वीट केला आहे. यात एक वेटर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी वापरत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. मिटकरींच्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Maharashtra Political News)

काय आहे प्रकरण?

नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं आहे. अधिवेशनाचे पहिले तीन दिवस विरोधकांनी चांगलेच गाजवले. आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिवाळी अधिवेशनातील आमदार निवास्थानातील उपहारगृहातील कपबशा टॉयलेटमध्ये धुतल्या जात असल्याचा आरोप केला आहे.

अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी याबाबतचा व्हिडीओ देखील ट्विट केला आहे. 'हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राट दाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था.#आझादीकाअमृतमहोत्सव', असं म्हणत मिटकरींनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे.  (Latest Marathi News)

व्हिडीओत काय आहे?

अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेला व्हिडीओ एका टॉयलेटमधील आहे. व्हिडीओत एक वेटर कपबशा धुण्यासाठी चक्क टॉयलेटमधील पाणी वापरत असल्याचं दिसून येत आहे. हा वेटर टॉयलेटमधील बेसीनमध्ये कपबशा धूत आहेत. याच कपबशांमध्ये आमदारांना चहा दिला जात असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे. मिटकरींनी ट्विट केलेला व्हिडीओ २० सेकंदाचा आहे. आता या व्हिडीओची महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT