विमा कंपनी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन कैलास चौधरी
महाराष्ट्र

विमा कंपनी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

जर बजाज इन्शुरन्स कंपनीने ही मागणी मान्य केली नाही तर येत्या 5 डिसेंबर रोजी मुंबई येथील त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - शेतकर्‍यांना त्वरीत आणि सरसकट विमा मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीने बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीविरोधात रस्ता रोको आंदोलन केले. सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या येडशी येथे हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीकडून करण्यात आले. परंतू आजपर्यंत बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीने शेतकर्‍यांना विमा मंजूर केलेला नाही. तसेच मागील वर्षाच्या विम्याची उर्वरित राहिलेली रक्कम अद्याप पर्यंत शेतकर्‍यांना दिलेली नाही.

हे देखील पहा -

त्यासोबतच या वर्षी शेतकर्‍यांकडून विमा कंपनीच्या प्रतिनिधीने पैशाची मागणी केली आहे. त्यामुळे सादर प्रतिनिधी विरुद्ध फौजदारी खटले दाखल करून बजाज इन्शुरन्स विमा कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी करत सरसकट हेक्टरी 20 हजार रुपयांची मागणी या आंदोलन मार्फत करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, जर बजाज इन्शुरन्स कंपनीने ही मागणी मान्य केली नाही तर येत्या 5 डिसेंबर रोजी मुंबई येथील त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. आंदोलन सुरू करण्यापूर्वी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आणि 26/11 मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandipura Virus: २२ मुलांचा बळी घेणारा चांदीपुरा व्हायरस आहे तरी काय? सर्वाधिक धोका कुणाला?

Maharashtra News Live Update: वाघाचे ठसे आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Nagpur Crime: नागपूरमध्ये रक्तरंजित थरार! तरुणावर तलवार अन् चाकून सपासप वार, वाचवायला गेलेल्या २ मित्रांनाही सोडलं नाही

Cham Cham Recipe: घरीच बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट चमचम, वाचा सोपी रेसिपी

६ बंडखोर खासदार,५० टक्क्यांहून अधिक आमदार NDAची साथ सोडणार; मोठा राजकीय भूकंप होणार? बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT