नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह; तर पोलिसांच ऑपरेशन ऑल आऊट! Saam Tv
महाराष्ट्र

नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह; तर पोलिसांच ऑपरेशन ऑल आऊट!

नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरु झाला असल्याने नक्षलवादी कारवायांची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलसांनी ऑपरेशन ऑल आऊट सुरु केलं आहे.

संजय डाफ

नक्षलग्रस्त भागातील नक्षलवादी आपलं अस्तित्व दाखवन्यासाठी अधून मधून तेथील नागरिकांना त्रास देणं किंवा प्रशासनाला आव्हान देणं याबाबतच्या कारवाया सुरु असतात याठिकाणी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांमध्ये आणि नक्षल्यांमध्ये तर सतत संघर्ष सुरुच असतो.

अशातच आता नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरु झाला असल्याने नक्षलवादी कारवायांची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलसांनी ऑपरेशन ऑल आऊट सुरु केलंय तसंच नक्षलग्रस्त भागात पोलीसांनी अलर्ट जारी केला आहे तसेच या सप्ताहात नक्षलवाद्यांकडून घातपातासाठी ड्रोन चा वापर होण्याची शक्यता असल्याचीही माहिती मिळत आहे. यासंदर्भातील माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.Naxal martyr week begins; So the police operation is all out

नक्षलवाद्यांचाNaxal शहीद सप्ताह सुरु झालाय. त्यामुळे महाराष्ट्र,Maharashtra आंध्रप्रदेशAndrapradesh आणि छत्तीसगढमध्येChhattisgarh पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झालेय. या शहीद सप्ताहादरम्यान नक्षलवादी घातपात करण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढ पोलीसांनी अलर्ट जारी केलाय. शहीद सप्ताहा दरम्यान नक्षलवादी कारवायांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलसांनीMaharastra police Operation All out ऑपरेशन ऑल आऊट सुरु केलंय. या अंतर्गत गोंदिया आणि गडचीरोली जिल्हयात पोलीसांची गस्त वाढवण्यात आली असून, जंगलांमध्ये सी - ६० चे C-60 जवान अलर्टवर आहे.

तसेच नक्षली कारवायांसाठी आता नक्षलवाद्यांनी ड्रोन चा वापर सुरू केलाय. नागपूर सह हैद्राबाद येथून हे नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा होत असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे उप महानिरीक्षकDeputy Inspector संदीप पाटील यांनी दिली आहे.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT