नवाब मलिक हे नशा करून बोलतात- आ. अभिमन्यू पवार दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

नवाब मलिक हे नशा करून बोलतात- आ. अभिमन्यू पवार

अभिमन्यू पवार यांनी नवाब मलिक हे नशा करून बोलत आहेत, शुद्धीवर असलेला माणूस अस बोलत नाही अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या इशाऱ्यावर ड्रॅग रॅकेट सुरू असून याचा माफिया फडणवीस आहेत असा आरोप केला आहे. यानंतर लातूर औसा येथील आमदार अभिमन्यू पवार Abhimanyu Pawar यांनी नवाब मलिक हे नशा करून बोलत आहेत, शुद्धीवर असलेला माणूस अस बोलत नाही अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील पहा-

राज्यातील ड्रॅग प्रकरण Drugs Case दिवसेंदिवस वाढतच आहे. यातुन आरोपप्रत्यारोप सुरूच आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केला. राज्यातील ड्रॅग प्रकरण हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर सुरू असून या प्रकरणाचा मास्टर माईड देवेंद्र फडणवीस आहेत या गंभीर आरोपनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

लातुर जिल्ह्यातील औसा येथील भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी मंत्री मलिकांचा समाचार घेतला आहे. शुद्धीवर असलेला माणूस अस बोलत नसतो. मलिक जावयासोबत ड्रग पार्टीला बसले होते काय ? राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्री नवाब मालिकांवर कंट्रोल करायला हवंय. कधी वानखेडेच्या जातीविषयी तर कधी धर्माविषयी, किती पत्नी आहेत अश्या विषयावर बोलत सुटले आहेत.

मुख्यमंत्र्यानी सोपवलेलं वैधानिक काम सोडून उगाच इतर विषयावर बोलत आहेत. त्याच जावई प्रेम उतू चाललं आहे. त्यांना जावाइप्रेम भोवणार आहे असा तिखट शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. दिवाळीच्या नंतर नक्कीच बॉम्ब फोडणार आहोत अशी प्रतिक्रिया मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT