प्रथम मानाचा व नवसाचा श्री दादा गणपती मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने विसर्जन संपन्न दिनू गावित
महाराष्ट्र

प्रथम मानाचा व नवसाचा श्री दादा गणपती मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने विसर्जन संपन्न

१३९ वर्षांची परंपरा असलेल्या प्रथम मानाचा आणि नवसाच्या श्री दादा गणपतीची यंदा शासनाच्या निर्बंधांमुळे मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने निरोप देण्यात आला

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : ३९ वर्षांची परंपरा असलेल्या प्रथम मानाचा आणि नवसाच्या श्री दादा गणपतीची यंदा शासनाच्या निर्बंधांमुळे मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने निरोप देण्यात आला आहे. मागील ९८ वर्षापासून श्री दादा गणपतीची रथात बसवून, भक्तांद्वारे रथ खेचून विसर्जनाची परंपरा आहे. सुरूवातीला ही परंपरा पायी चालून त्यानंतर सायकलवर आणि लाॅरीद्वारे केली जात होती.

हे देखील पहा-

गेल्या ९८ वर्षापासून रथातून श्री दादा गणपतीची विसर्जनाची परंपरा आहे. अनंत चतुर्थी निमित्त विधिवत पूजा अर्चनासह श्री दादा गणपती रथावर विराजमान करून बाप्पाला शहरातील सोनी विहिर या ठिकाणी विसर्जन करण्यात आले आहे. श्री दादा गणपतीच्या अखेरच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पोलिस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. श्री दादा गणपतीच्या विसर्जनानंतर शहरातील श्रीमंत बाबा गणपतीची विसर्जनाला सुरवात झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT