Igatpuri Garba Event Girls Fight  Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video : गरबा खेळताना तरुणींमध्ये जोरदार फाईट; एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

नवरात्रीत गरबा खेळत असताना तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

साम टिव्ही ब्युरो

Igatpuri Garba Event Girls Fight : राज्यासह देशभरात सध्या नवरात्रीचा (Navratra) उत्सव मोठा जल्लोषात साजरा केला जातोय. ठिकठिकाणी गरबा (Garba) खेळत अनेकजण नवरात्रीचा आनंद लुटताना दिसत आहे. अशातच नवरात्रीत गरबा खेळत असताना तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Girl Fight Viral Video)

या व्हिडीओत तरुणींचे (Girl Fight) दोन गट एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील असल्याचं सांगितलं जातंय. व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहू शकता की नवरात्रीचा उत्सवानिमित्त गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. या ठिकाणी तरुण-तरुणींसह थोर-मोठ्यांची उपस्थिती दिसत आहे. (Igatpuri News Today)

व्हिडीओमध्ये चित्रपटातील गाणी सुद्धा ऐकू येत आहे. सर्वजण आनंदात दिसत आहे. इतक्यात एक काळा टॉप परिधान केलेली तरुणी दुसऱ्या तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या तरुणीच्या अंगावर धावून जाते आणि केस ओढून तिला मारहाण करायला सुरूवात करते. (Garba Dance Fight Video)

या दोन तरुणींची मारहाण सुरू होताच, कार्यक्रमात थोडा गोंधळ निर्माण होतो. त्यानंतर इतर तरुणी या दोघींकडे धाव घेतात आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, दोघीही तरुणी काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. या दोघींना सोडवण्याच्या नांदात इतर तरुणींमध्येही हाणामारी सुरू होते. या हाणामारी तरुणी एकमेकींचे केसही ओढताना दिसून येत आहेत.

तरुणींच्या दोन गटात सुरू असलेली हाणामारी पाहून तिथे उपस्थित असलेले तरुण आपल्या मोबाईलमध्ये हाणामारीची दृश्य कैद करतात. तरुणींचा या दोन गटात राडा होत असताना, कुणीही त्यांच्यात मध्यस्थी करताना दिसून येत नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT