Navneet Rana Saam Tv
महाराष्ट्र

एसटी संप : ठाकरे- परब फेल; पवारांमुळे गाेड बातमी मिळेल : राणा

तीन पक्षाचे सरकार कोण चालवते आहे हे आज स्पष्ट झाले.

अरुण जोशी

अमरावती : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या (msrtc) प्रश्नात लक्ष घातलेने आता आशेचा किरण निर्माण झाला आहे. आता एक चांगला संदेश सर्वांपर्यंत मिळेल व एसटी कर्मचारी आंदोलनावर लवकर तोडगा निघेल अशी आशा बाळगवू या असे खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी नमूद केल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) व मंत्री अनिल परब (anil parab) हे सरकारमध्ये फेल गेल्याची टीका खासदार राणा यांनी केली.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप ताेडगा निघालेला नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीवरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा म्हणाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब हे सरकारमध्ये अपयशी ठरल्याचे सिद्ध हाेत आहे. तीन पक्षाचे सरकार कोण चालवते आहे हे आज स्पष्ट झाले.

शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले आहे. त्यामुळे आता आशेचा किरण निर्माण झाला आहे. एक चांगला संदेश मिळेल व एसटी कर्मचारी आंदोलनावर लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Dev Vakri: 12 तासानंतर शनीदेव चालणार वक्री चाल; 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस

Shocking News: बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध ठेवताना भयंकर घडलं, रक्तस्राव होऊन अल्पवयीन मुलीचा मृत्यू

Maharashtra Live News Update : खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांचं 'बंदूक फोटोशूट', चार जणांवर गुन्हा दाखल

Ulhasnagar Crime : मिरची स्प्रे फवारत रिक्षा चालकाला बेदम मारहाण; उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातील घटना

Kitchen Hacks: स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन चमकवायचा आहे? मग 'हे' सोपे उपाय नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT