Navneet Rana Says Pahalgam Terror Attack  Saam Tv News
महाराष्ट्र

Navneet Rana : माझा मुलगा म्हणतो, मी कट्टर हिंदुत्त्ववादी, गोळी खाईल पण...; नवनीत राणांचा पुन्हा हिंदुत्त्वाचा एल्गार

Navneet Rana Says Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे राज्यातील नेतेही पाकिस्तानविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

Prashant Patil

अमर घटारे, साम टिव्ही

अमरावती : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे राज्यातील नेतेही पाकिस्तानविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत आहेत. मात्र, दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्याने हिंदूंना लक्ष्य केल्याचं सांगत काही अंशी धार्मिक वादही उफाळून समोर आलाय. मात्र, हिंदू-मुस्लीम ऐक्याचीही अनेक उदाहरणे या हल्ल्यानंतर पाहायला मिळाली आहेत. त्यातच, भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा हिंदुत्त्वाचा एल्गार केला आहे. त्यांच्या लहान मुलाचे उदाहरण देत 'आपण गोळ्या खाणार, पण कुराण वाचणार नाही', असं नवनीत राणांनी म्हटलं आहे.

'पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना कुराण वाचायला सांगितलं. आमच्या बहिणींना वाचता आलं नाही, तेव्हा दहशतवाद्यांनी सगळ्या हिंदूंना आणि मुस्लिमांना एकाबाजूला केलं. आमच्या हिंदू भावांनी गोळ्या खालल्या पण कुराण वाचायला ते तयार झाले नाहीत', असं म्हणत नवनीत राणा यांनी पहलगाममधील घटनेची माहिती दिली. तसेच, 'माझा मुलगा लहान आहे, मी त्याला विचारलं की कुराण वाचणार का? तर तो म्हणतो की मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही', असं म्हणत नवनीत राणा यांनी आपल्या लहान सुपुत्राचं उदाहरण देत पुन्हा एकदा आपण कट्टर हिंदुत्त्ववादी असल्याचं जाहीर केलंय.

पाकिस्तानचा भुट्टो सांगतो की, 'सिंधु नदीचं पाणी थांबवलं तर त्याच नदीत हिंदूंचे रक्त दिसेल, अरे अख्ख्या पाकिस्तानमध्ये ताकद नाही की भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. कारण, भारतात एक वाघ राहतात, ज्याचं नाव नरेंद्र मोदी, अमित शहा आहे. आता पाणी काय तुमचं दाना पण बंद करू', असं नवनीत राणा यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदी हे भुट्टो सारख्याला भुट्ट्यासारखं भाजतील, मला मोदीजी, अमित शहा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या आयपीएलचा जेवढा खर्च आहे, तितका पाकिस्तानचा जीडीपी आहे', असंही नवनीता राणा यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT