navi mumbai airport name
navi mumbai airport name  saam Tv
महाराष्ट्र

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव; मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai international Airport) दि. बा. पाटील यांचे नाव देणार असल्याचे आश्वासन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिपुत्रांना दिलं होत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नवी मुंबई येथील भूमिपुत्रांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) हे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आज कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता मिळाली आहे.

दि.बा. पाटील यांच्या कार्यामुळे त्यांचा नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांमध्ये आदर आहे. त्यामुळे नवी मुबंई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र आग्रही होते. त्यासाठी अनेक आंदोलन आणि मोर्चे भूमिपुत्रांनी काढले होते. नवी मुंबईतील महिला देखील दि.बा. पाटील यांचे नवी मुबंई विमानतळाला देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. काल पुन्हा भूमिपुत्रांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मंत्रिमंडळात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला मिळाल्याने आंदोलन करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांचा मोठा विजय मानला जात आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा मुद्दा आता निकाली निघाला आहे.

काय होता वाद ?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होण्याआधीच राजकारणाच्या तावडीत सापडलं होतं. या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोत मंजूर झाला होता. राज्य सरकारनेदेखील या नावाला हिरवा कंदील दाखवला होता.

मात्र, इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून हे विमानतळ उभं राहत असल्याने प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी नवी मुंबईतील भुमिपुत्र, प्रकल्पग्रस्त संघटना, भाजप आणि मनसेपाठोपाठ आता काँग्रेसनेही केली होती. त्यामुळे या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नको तर दि.बा पाटलांचे नाव द्या या मागणीने चांगलाचं जोर धरला होता. शिवाय राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी पाहता ठाकरेंना आता भूमिपुत्रांचा रोष ओढावून घ्यायचा नव्हता. त्यानंतर दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिल्यानं हा मुद्दा निकाली निघाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai University Exams: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवीन वेळापत्रक

Shirur Loksabha: अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात! शिरुर मतदार संघात घेणार ५ सभा

Today's Marathi News Live: पंतप्रधान मोदी १० मेला नाशिक दौऱ्यावर येणार, पिंपळगामध्ये जाहीर सभा घेणार

Buldhana Breaking: किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी; गावात तणाव, १८ आरोपी अटकेत

Prices Of Pulses: डाळींच्या किंमती कडाडल्या!जाणून घ्या,आजचा प्रतिकिलोचा दर किती?

SCROLL FOR NEXT