Navi Mumbai Saam tv
महाराष्ट्र

Fraud : तरुण ड्रीम गर्ल बनून आयुष्यात आला; प्रेमाचे नाटक करत एकाला ३३ लाख रुपयांत गंडविले

Navi Mumbai News : दीड वर्षांपर्यंत सुरु होता. या कालावधीत त्याने वेळोवेळी पैशांची मागणी करत ३३ लाखांना आर्थिक फसवणूक केली या पैशातून त्याने गाडी, मोबाईल, मॅकबुक अश्या महागड्या वस्तू खरेदी केल्या

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: फ्रॅंक कॉल करून किंवा प्रेमाच्या जाळ्यात ओढत फसवणूक करण्याचे अनेक प्रकार आजपर्यंत समोर आले आहेत. मात्र देहरादुन मधील एका तरुणाने बंबल अँपच्या सहाय्याने एका इसमासोबत महिलेच्या आवाजात संवाद साधला. यानंतर प्रेमाचे नाटक करत त्याच्याकडून पैसे उकडले. यात साधारण ३३ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कैलासचंद मीना असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो मूळचा जयपूर येथील रहिवासी आहे. देहरादुन येथे नातेवाईकांकडे तो वास्तव्यास होता. दरम्यान कैलासचंद हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. मात्र त्याने अर्ध्यावरच आपले शिक्षण सोडले होते. पैशांची गरज भागविण्यासाठी आणि टेक्निकल ज्ञान असल्याने त्याने डेटिंग अँपच्या सहाय्याने कोपरखैरणे येथील इसमासोबत महिलेच्या आवाजात बोलणे सुरु केले. 

फसवणूक करत घेतल्या महागड्या वस्तू 

दरम्यान सदर इसमाशी बोलत त्याने प्रेमाचे नाटक केले. साधारण हा प्रकार दीड वर्षांपर्यंत सुरु होता. या कालावधीत त्याने वेळोवेळी पैशांची मागणी करत तब्बल ३३ लाखांना आर्थिक फसवणूक केली आहे. या पैशातून त्याने गाडी, मोबाईल, मॅकबुक अश्या महागड्या वस्तू खरेदी केल्या होत्या. पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या असून या तरुणाने आणखी काही जणांना फसवले आहे का? याची अधिक चौकशी नवी मुंबई सायबर पोलीस करत आहेत.

सायबर पोलिसांनी घेतले ताब्यात 

दीड वर्षांपर्यंत प्रेमाचे नाटक करुन सदर तरुणाने विविध कारणासाठी पैशाची मागणी करत इसमाला ३३ लाख रुपायांना गंडा घातला. दरम्यान सदर इसमाला संशय आल्याने त्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर सायबर पोलीसांनी गुन्हा नोंद करत तपासाला सुरुवात केली आणि आरोपी ड्रीम गर्लला थेट देहरादुन मधून अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT