Navi Mumbai Saam tv
महाराष्ट्र

Navi Mumbai : भारतीय रेल्वेत नोकरीचे आमिष; १ कोटी ३१ हजार घेत बांधले आलिशान घर

Navi Mumbai News : नवी मुंबईच्या खारघरमध्ये हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पंडित पोवार याच्यासह इतर ५ जणांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: भारतीय रेल्वेमध्ये कारकून या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २० जणांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघरमध्ये समोर आला आहे. यात संबंधिताने तब्बल १ कोटी ३१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. 

नवी मुंबईच्या (Navi Mumbai) खारघरमध्ये हा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पंडित पोवार याच्यासह इतर ५ जणांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडित पोवार याने आपली रेल्वे प्रशासनात ओळख असल्याचे सांगत कारकून या पदावर नोकरी लावून देणार असे (Fraud) आमिष दिले. अशा प्रकारे त्याने २० जणांकडून तब्बल १ कोटी ३१ हजार रुपये घेतले. मात्र संबंधितांना नोकरी लावून न दिल्याने हा प्रकार समोर आला. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. 

पैसे घेऊन कोल्हापुरात बांधले आलिशान घर 

महत्वाचे म्हणजे या फसवणूकतून मिळालेल्या पैशातून पंडित पोवार याने आपल्या कोल्हापूर येथील गावी आलिशान घराचे बांधकाम केल्याचे उघड झाले आहे. मागील दोन वर्षांपासून हा फसवणूकीचा प्रकार सुरु असून पैसे परत न केल्याने फिर्यादी यांनी अखेर खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खारघर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT