Khopoli Imagica 13 year old Ayush dies SaamTV
महाराष्ट्र

Navi Mumbai News : सहलीसाठी गेला असताना उलटी आणि बेशुद्ध, इमॅजिकामध्ये झालेल्या आयुषच्या मृत्यूचं खरं कारण समोर

Navi Mumbai Ayush Dies While on Trip : आयुषचा मृत्यू कशामुळे झाला? याची माहिती आता समोर आली आहे. १३ वर्षीय आयुष सिंग याचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Prashant Patil

नवी मुंबई : नवी मुंबईतील महापालिकेच्या शाळेच्या पिकनिकसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा काल मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील मनपा शाळा क्रमांक ७६ची पिकनिक काल खोपोली येथील इमॅजिका येथे गेली होती. या सहलीमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आयुषला उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

दरम्यान, आयुषचा मृत्यू कशामुळे झाला? याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. १३ वर्षीय आयुष सिंग याचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, खोपोली येथील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. वॉटर पार्कमध्ये इतर मुलांसोबत राईड खेळून झाल्यानंतर हा मुलगा थकला होता, त्यानंतर त्याला अचानक उलट्या सुरू झाल्या. स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला अॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात पाठवण्याचा प्रयत्न केला गेला, पण वाटेमध्येच मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली होती पण आयुषचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्वामी अविमुक्तेश्वरानंदचे काळे कृत्य उघड, आश्रमातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कोर्टाकडून FIR नोंदवण्याचे आदेश

भाजपविरोधात आंदोलन महागात पडलं, झीनत यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

KHxRK Teaser Out: हिरो कोण...? ४७ वर्षांनी रजनीकांत आणि कमल हासन येणार पुन्हा एकत्र

Ashubha Animals: महत्वाच्या कामाला जाताना कोणते पक्षी-प्राणी दिसणे मानले जाते अशुभ? शकुनशास्त्रातील संकेत...

Maharashtra Live News Update: जालन्यात युवा सेनेचं जोडे मारो आंदोलन

SCROLL FOR NEXT