Navi Mumbai Saam tv
महाराष्ट्र

Navi Mumbai : घरात घुसून तरुणीला बेदम मारहाण; कुत्रा घाण करत असल्याच्या कारणातून शेजाऱ्यांकडून भयानक कृत्य

Navi Mumbai News : निशा वाघेला घरात लादी पुसत होती. यावेळी शेजारील मनोज नामक इसम घरासमोर आला व “तुम्हारा कुत्ता मेरे घर के सामने गंदगी करता है, उसको संभालो नही तो तुमको मैं मार डालूंगा" असे बोलू लागला

Rajesh Sonwane

विकास मिरगणे 
नवी मुंबई
: शेजारी राहणाऱ्यांनी कुत्रा पाळलेला असून हा कुत्रा घराच्या अंगणात घाण करतो; या कारणातून शेजारी राहणाऱ्या इसमाने घरात घुसून तरुणीला डोक्यात दगड घालत बेदम मारहाण केली. सदरची धक्कादायक घटना ऐरोली जुना चिंचपाडा परिसरात घडली आहे. याबाबत रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरु आहे. 

नवी मुंबईच्या आदिवासी पाडा, जुना चिंचपाडा ऐरोली येथे वास्तव्यास असलेल्या निशा वाघेला (वय २५) या तरुणीला मारहाण करण्यात आली आहे. निशा हि मोठी बहीण अंजु व तिच्या मुलीसोबत वास्तव्यास आहे. दरम्यान शुक्रवारी (२० जुन) पहाटे निशा वाघेला घरात लादी पुसत होती. यावेळी शेजारील मनोज नामक इसम घरासमोर आला व “तुम्हारा कुत्ता मेरे घर के सामने गंदगी करता है, उसको संभालो नही तो तुमको मैं मार डालूंगा" असे बोलू लागला. त्यावेळी निशा यांनी तु असे का बोलत आहे, हवे तर मी घाण साफ करते; असे बोलत घरात जाऊ लागली.  

दगडाने मारहाण करत उचलून घराबाहेर फेकले 

याच वेळी काहीही न बोलता मनोजने पाठीमागुन येत दगडाने निशाच्या डोक्यावर व चेहऱ्यावर मारहाण केली. तसेच तिला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. यावेळी निशाने आरडाओरडा केली असता मनोजने तिला उचलुन घराबाहेर फेकून दिले. निशाचा आरडाओरडा बघता शेजारील लोक जमा झाले असता घाबरुन मनोजने तेथून पळ काढला. तर औषध आणायला गेलेल्या निशाच्या बहिणीला घडलेला प्रकार समजताच तिने घराकडे धाव घेतली. 

पोलिसात गुन्हा दाखल 

निशा जमिनीवर पडलेली होती. तिच्या डोक्यातून व डोळ्याजवळून रक्त येत होते. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर वाशी येथील पालिका रुग्णालयात दाखल करून प्राथमिक दवा उपचार करण्यात आले. तर अंजु व निशा वाघेला यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून मनोज यांच्यावर रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत गुन्हा नोंद केला. या प्रकरणी पोलीसांकडून अधिक चौकशी सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

SCROLL FOR NEXT