Navneet Rana Crying Video Saam Tv
महाराष्ट्र

Navneet Rana: पाच वर्ष प्रामाणिकपणे काम केलं, पण; नवनीत राणा यांना अश्रू अनावर; VIDEO

Navneet Rana Crying Video: आज एका कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. माजी खासदार नवनीत राणा या मेळघाट दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर धारणी येथे आभार सभा घेतली.

Saam Tv

अमर घटारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या मनात असल्याचं अजूनही पाहायला मिळत आहे. आज एका कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. माजी खासदार नवनीत राणा या मेळघाट दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर धारणी येथे आभार सभा घेतली.

पाच वर्षे पूर्ण प्रामाणिकपणे काम केलं, खूप त्रास होतो, जेव्हा, जेव्हा मेरिटमध्ये आलेला विद्यार्थी नापास होतो, असं बोलताना नवनीत राणा व्यासपीठावर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ''माझ्याविरोधात खोटा प्रचार केला गेला.'' मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यावर आरोप करत नवनीत राणा म्हणाल्या की, ''राजकुमार पटेल दगाबाज आहेत. माझ्यासह आदिवासींसोबत त्यांनी बेहमानी केली. माझ्या पराभवाची राजकुमार पटेल यांनी सुपारी घेतली. पैसे घेऊन माझ्याविरोधात त्यांनी काम केलं.''

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रवी राणा यांनी बच्चू कडू आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. नवनीत राणा यांना सुपारी घेऊन पाडलं, असा आरोप त्यांनी केला होता. रवी राणा म्हणाले होते की, '' 'नवनीत राणा यांना सुपारी घेऊन पाडलं. मविआने खोटा नरेटिव्ह सेट केला. संविधान कोणाचा बाप बदलू शकत नाही. खोट बोलून प्रचार करुन मत मिळवली. येणाऱ्या काळात माझा पक्ष देखील मैदानात असेल. या पराभवाची मी जबाबदारी घेतली आहे.''

ते म्हणाले होते की, '' आज अमरावतीचा विकास थांबला हे प्रत्येक मतदाराला माहित आहे. सुपारीबाजांना जनता धडा शिकवणार आहे. आगामी निवडणुकीत ताकदीने लढू.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT