Sharad pawar  saam tv
महाराष्ट्र

आगामी निवडणुकांसाठी रणनीती, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत होणार खलबतं

राष्ट्रवादी कॉंग्रसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पक्षाच्या बैठकीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक

मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांनी बंडाचं निशाण फडकवल्याने महाविकास आघाडीचे सरकार (mva government) कोसळले. बंडखोर आमदारांच्या या राजकीय गुगलीचा सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसला आहे. परंतु मविआत महत्वाचं घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांच्या नेतृत्वात उद्या १२ जुलैला राष्ट्रवादीच्या बैठकीचे (ncp meeting tomorrow) आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिलेली माहिती अशी की, राष्ट्रवादीची बैठक पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मंगळवारी होणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे नेते,पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष, फ्रंटलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. तर १३ जुलै रोजी राष्ट्रवादी मुंबई विभागीय कॉंग्रेसचीही बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT