Sharad Pawar ANI
महाराष्ट्र

Cyrus Poonawala: सायरस पुनावाला यांना भारतरत्नाने सन्मानित करावं; शरद पवार यांची मागणी

Sharad Pawar : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) च्या संस्थापक सायरस पुनावाला यांनी लस निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. भारत सरकारने त्यांचा सन्मान भारतरत्न पुरस्कार देऊन करावा, अशी मागणी शरद पवार यांनी केलीय

Bharat Jadhav

Cyrus Poonawalla Honoured With Bharat Ratna Award Says Sharad Pawar:

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) च्या संस्थापकाने लस निर्मिती क्षेत्रात केलेल्या कार्याचे कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) संस्थापक शरद पवार यांनी सायरस पुनावाला यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली. पुण्यातील एका पुरस्कार समारंभात ते बोलत होते.(Latest News)

सीरम इन्स्टिट्यूटची लस कोविडसह अनेक आजारांवर कशी प्रभावी ठरली. लस निर्माण करण्यात पुनावाला यांचे योगदान किती मोठे आहे, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. सायरस पुनावाला यांचे कौतुक करताना शरद पवार म्हणाले, "जगात जेव्हा जेव्हा पाच मुले जन्माला येतात, तेव्हा त्यातील तीन मुलांना सीरमची लस दिली जाते. तसेच कोरोना या साथीच्या काळात सीरम इन्स्टिट्यूटने संपूर्ण जगाला लस पुरवली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे आफ्रिकन देशांमध्ये ही लस मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आली आणि त्यासाठी सायरस पुनावाला आणि त्यांच्या टीमने लोकांना लस पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली होती, असं शरद पवार म्हणाले. लसींच्या क्षेत्रात सायरस पुनावाला यांचे कार्य लक्षणीय आहे. त्यामुळे भारत सरकारने त्यांना पद्मश्री प्रदान करणं हे आम्हाला ते योग्य वाटले नाही, पण नंतर त्यांना पद्मभूषण देण्यात आले. आज जगातील नवीन पिढी लसींच्या क्षेत्रात काम करत आहे. त्यांचे योगदान पाहता सरकारने त्यांना पद्मभूषण पुरते मर्यादित न ठेवता त्यांना भारतरत्न दिले पाहिजे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT