धक्कादायक ! विष पाजण्याची धमकी देत जावयाने केला सासूवर बलात्कार Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक ! विष पाजण्याची धमकी देत जावयाने केला सासूवर बलात्कार

नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विष पाजण्याची धमकी देत जावयानेच चक्क सासूवरच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, मागील सप्टेंबर महिन्यामध्ये पीडित महिलेच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीला महिला मूळ रिसोड तालुक्यातून नाशिकमध्ये आली होती.

यावेळी संशयित नितीन आशू वाणी (वय- ३५, रा. भारतनगर, मूळ वाशिम) याने पीडित महिलेला आपल्या घरी बोलावून घेत साडीचोळी करण्याचा बनाव केला. पीडित महिला रात्री मुक्कामी थांबली असता मध्यरात्रीच्या सुमारास संशयित नितीन याने नात्याने मावस सासू लागणाऱ्या पीडितेचा झोपेत गळा दाबला आणि त्यांना विषाची (Poison) बाटली दाखवून दमदाटी करत बलात्कार (abuse) केल्याचे फिर्यादीमध्ये पीडित महिलेने सांगितले आहे. (Nashik youth abuse her mother law)

हे देखील पहा-

यानंतर पुन्हा १ ऑक्टोबर दिवशी पीडितेला तिची अश्लील छायाचित्रे मोबाइलवर (mobile) दाखवून धमकावत एका हॉटेलमध्ये (hotel) येण्यास भाग पाडले आणि त्याठिकाणी देखील संशयिताने पुन्हा बलात्कार केला आहे. यानंतर १० नोव्हेंबर दिवशी संशयित नितीन याने अमरावती (Amravati) गाठून तेथे पीडितेच्या राहत्या घरी जाऊन पुन्हा शारीरिक अत्याचार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप (Allegations) पीडितेने फिर्यादीमध्ये केला आहे.

यानंतर पीडित महिलेने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव (Nandgaon) पेठ पोलीस (Police) ठाण्यामध्ये धाव घेत घडलेला प्रकार सांगितले आहे. पोलिसांनी तेथे गुन्हा दाखल करून प्रथम घटना नाशिक (Nashik) मधील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्याने हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित नितीन हा अद्याप फरार असून पुढील तपास मुंबईनाका पोलिसांकडून केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

SCROLL FOR NEXT