Nashik Water Supply Cut Today Saam TV
महाराष्ट्र

Nashik Water Supply : नाशिककरांनो, पाणी जपून वापरा; शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

Nashik Water Supply Cut Today : नाशिककरांना पुढील दोन दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण येत्या शनिवारी आणि रविवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Satish Daud

मे महिन्याच्या अखेरीस राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक भागात पाणीकपात करण्यात आली आहे. नाशिककरांना पुढील दोन दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण येत्या शनिवारी आणि रविवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या देखभाल दुरुस्ती तसेच जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी आणि रविवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी दुपारनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल.

त्यामुळे दोन दिवस नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे. नाशिक शहराला गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराला रोज २० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते.

या धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं असून अघोषित पाणाकपातीला सुरुवात केली आहे. गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणात केवळ १,०९१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे.

धरणात आरक्षित असलेला पाणीसाठा १२ जुलैपर्यंतच पुरणार आहे. नाशिक व अहिल्यानगरच्या धरणांमधून जायकवाडी धरणासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडल्यामुळे यंदा नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime: मेसेज करायला लावायचा,अभ्यासाच्या नावाने केबिनमध्ये बोलवून नको ते करायचा; प्राध्यापकाचे विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

Maharashtra Live News Update : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून महायुतीत कलगीतुरा; 'तोडगा निघाला नाही तर शेवटच्या टोकापर्यंत लढू' - मंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा

Womens Day 2026 : लाडक्या बायकोला द्या कामापासून सुट्टी; खास तिच्यासाठी बनवा 'हा' चटपटीत पदार्थ, रेसिपी आहे खूपच सोपी

शेजारच्या महिलेला चिमुकलीने ‘मम्मा’ म्हटलं; संतापलेल्या आईने 3 वर्षांच्या दत्तक मुलीला बेदम मारलं, VIDEO व्हायरल

होळीचे रंग आणि गुलाल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग; पाच महिलांचा मृत्यू, अनेक कामगार जखमी

SCROLL FOR NEXT