Nashik Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Road Accident News: नाशकात भीषण अपघात; बस अन् ट्रकची समोरासमोर धडक, 10 जणांचा मृत्यू

Nashik Truck Bus Accident News: बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी

अभिजीत सोनावणे

Nashik Accident News : नाशिक येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला आहे. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.

अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये ८ महिला आणि पुरुष तर २ मुलांचा समावेश आहे. तर 35 ते 40 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. (Nashik Road Accident News)

मुंबई (Mumbai) येथून शिर्डी (Shirdi) कडे जाणारी खाजगी आराम बस आणि शिर्डी कडून सिन्नरकडे जाणारा मालट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या घटनेमुळे पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाका दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती.

अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डी कडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघाल्या होत्या. त्यातील एका बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 ते 40 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder: बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

Bhoplyache Soup Recipe : गरमागरम भोपळ्याचे सूप कधी प्यायलात का? एका घोटात येईल तरतरी

Maharashtra Live News Update: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर

Lpg Gas Cylinder: तुमच्या किचनमध्ये कोणतं इंधन वापरतात? LPG, PNG, CNG आणि LNG नेमका वापर काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

मीनाकारी जोडव्यांचे फॅन्सी डिझाइन; चारचौघीमध्ये तुमचा लूक दिसेल रॉयल

SCROLL FOR NEXT