Nashik Breaking News Saam Tv News
महाराष्ट्र

Nashik News : देव तारी त्याला कोण मारी! बाईक रिव्हर्स घेताना पत्रा उडाला, वेळीच खाली वाकला म्हणून वाचला; नाशिकमधील थरारक VIDEO

Nashik Weather Update : नाशिकच्या अशोकनगर भागात जोराचा वादळी वारा सुरु झालाय. या वादळी वाऱ्याने पत्रा जोरात हवेत उडाला. हवेत उडालेला पत्रा दुचाकीवर बसलेल्या एका तरुणाच्या गळ्यात जाऊन घुसला असता.

Prashant Patil

नाशिक : महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत, कारण कडाक्याच्या उन्हाळ्यात हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मेघगर्जनासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (Maharashtra weather alert) ६ आणि ७ मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुढील ४८ तास राज्यात सर्वत्र वादळी-वाऱ्यासह गारपीटीचा (unseasonal rain Maharashtra) इशारा दिलाय. देशात जम्मू कश्मीर ते तामिळनाडूपर्यंत उद्यापासून पाऊस कोसळणार आहे.

त्याचदरम्यान, नाशिकच्या अशोकनगर भागात जोराचा वादळी वारा सुरु झालाय. या वादळी वाऱ्याने पत्रा जोरात हवेत उडाला. हवेत उडालेला पत्रा दुचाकीवर बसलेल्या एका तरुणाच्या गळ्यात जाऊन घुसला असता. मात्र, तो वेळीच खाली वाकल्याने तरुण थोडक्यात बचावला. तर जिल्हा आणि सत्र न्यायालयावरील पत्रे देखील वादळी वाऱ्याने उडाले आहेत. सिडको परिसरात काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत.

दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर, पुण्यासह राज्यातील (IMD rain forecast) अनेक शहरासाठी पुढील ४८ तासांत यलो अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत Mumbai rain update मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता (thunderstorm warning, hailstorm forecast) वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे.

पुण्याला चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उद्यापासून पुण्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारपासून पुढील चार दिवस पुणे जिल्ह्याला 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे. कडाक्याच्या उन्हात पुणेकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे. पण अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! पुण्यात जमावबंदीनंतर रात्री १० नंतर खाद्यपदार्थ विक्री अन् पानटपऱ्या बंद

Maharashtra News Live Update: सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात २६ मे पासून वाढ

Crime: शिंदेसेनेच्या आमदाराच्या PA ला गोव्यात मारहाण, कुटुंबीयांनाही सोडलं नाही

Palak Paneer Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल स्वादिष्ट पालक पनीर रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

वंशाचा दिवा मुलगाच हा समज खोटा, विज्ञानाने दिला धक्का; आईकडूनच पुढे जातो खरा DNA

SCROLL FOR NEXT