Nashik ST Bus Accident News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Bus Accident: सप्तश्रृंगीगड घाटात ३५ प्रवाशांसह बस दरीत कोसळली; अंगाचा थरकाप उडवणारे PHOTOS

Nashik ST Bus Accident News: प्रवाशांना घेऊन जाणारी बस सप्तश्रृंगी घाटातील दरीत कोसळली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून १८ ते २० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

Satish Daud

नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे.

Nashik ST Bus Accident News

बसमधून अंदाजे ३५ प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी १८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Nashik ST Bus Accident News

मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाग्रस्त बस सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात होती.

Nashik ST Bus Accident News

खामगाव आगाराची बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस गडावरुन खाली यायला निघाली.

Nashik ST Bus Accident News

दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस यामुळे घाटातील अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटून बसचा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Nashik ST Bus Accident News

घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमी प्रवाशांना वणी उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Nashik ST Bus Accident News

या घटनेनंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगावहून अपघात स्थळाच्या दिशेने रवाना झाले असून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

Nashik ST Bus Accident News

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT