Nashik Shocking x
महाराष्ट्र

Nashik Shocking : मैत्रिणीसह फोटोग्राफर तरुणीला हॉटेलमध्ये डांबलं; शरीरसुखाची मागणी केली, पिस्तुलाचा धाक दाखवला अन्...

Nashik : फोटोग्राफर तरुणी आणि तिच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबवून ठेवणाऱ्या एका हॉटेल चालक आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Yash Shirke

  • नाशिकमध्ये फोटोग्राफर तरुणी आणि मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबून ठेवले.

  • आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवत शरीरसुखाची मागणी केली आणि पैसे लुटले.

  • पोलिसांनी हॉटेल चालक आणि साथीदारांना अटक करून पोलीस कोठडी सुनावली.

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nashik City : नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नाशिक शहरातील एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणी आणि तिच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये जबरदस्तीने डांबून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवत अनैतिक व्यवसाय करण्याबाबत सांगितल्याचे तरुणीने पोलिसांनी सांगितले आहे.

पीडित तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील फोटोग्राफर तरुणीसह तिच्या मैत्रिणीला एका हॉटेलचालकाने त्याच्या साथीदारांसह डांबवून ठेवले होते. हॉटेलमध्ये जबरदस्तीने डांबवून ठेवत त्या दोघींकडून शरीरसुखाची मागणी करण्यात आली. पिस्तुलाचा धाक दाखवत अनैतिक व्यवसाय करण्यास सांगितले. याशिवाय त्यांच्याकडून पैसेही लुटले.

या गंभीर प्रकरणात म्हसरूळ पोलीस ठाण्यात हॉटेल चालक आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना ही चार महिन्यांपूर्वी घडली होती. पीडित तरुणींनी सुरुवातीला भीतीपोटी तक्रार दाखल केली नव्हती. आरोपींकडून पुन्हा धमक्या आल्यानंतर अखेर त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली.

फोटोग्राफर तरुणीसह तिच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबवून ठेवत त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्या प्रकरणी पोलिसांनी नाशिक शहरमधील संशयित हॉटेल चालक आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

Pitru Paksha : ना कांदा, ना लसूण; पितृपक्षात बनवा 'ही' झणझणीत रस्सा भाजी

SCROLL FOR NEXT