Nashik Road Crime News
Nashik Road Crime News saam tv
महाराष्ट्र

Nashik Youth killing: आधी किरकोळ वाद, नंतर तुफान हाणामारी! तरुणाची धारदार श्त्राने वार करून हत्या

साम टिव्ही ब्युरो

Nashik Road Crime News: नाशिक रोड भगात किरकोळ वादातून अज्ञात व्यक्तीने एका युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिक रोड सिन्नर फाटा प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या बाहेर मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या शेडजवळ हा खून झाला आहे. अजय काळे असे 21 वर्षीय फुगे विक्री करणाऱ्या मृत युवकाचे नाव आहे. संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील पखुरा येथील तो रहिवाशी आहे.

सायंकाळी फुगे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये आपापसात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यावेशी अज्ञात व्यक्तीने अजय काळे आणि त्याच्यासोबत असलेल्या युवकाला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश किसन शेळके आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

या मारहाणीत दोन्ही युवकांपैकी अजय काळे या युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजयच्या छातीवर जखम असून चाकूने किंवा इतर शस्त्राने त्याच्यावर वार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Crime News)

नाशिक रोड बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात युवकाला उपाचारासाठी आणल्यानंतर ईसीजी करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता असे पोलिसांनी सांगितले. यातील खुनाचे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसोशीने तपास करीत आहेत. नाशिक रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गर्शनाखाली सुरू आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashid Khan Six: पैज लावा, असा शॉट पाहिलाच नसेल! राशिदने खेचला 'स्नेक स्टाईल' षटकार

Skin Care: चेहऱ्यावर साबण लावताय?होऊ शकतात या गंभीर समस्या

Ananya Panday : क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो

400cc चे पॉवरफुल इंजिन, स्टाईश लूक; Bajaj Pulsar NS400 पुढील आठवड्यात होणार लॉन्च

Today's Marathi News Live: नरेंद्र मोदींनी 60 कोटी तरुणांना मुद्रा लोन दिलं; देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT