godawari 
महाराष्ट्र

गोदावरीला पूर; सोमेश्वर धबधब्यावर गर्दी टाळा प्रशासनाचे आवाहन

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : येथील प्रसिद्ध सोमेश्वर धबधब्यास गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याने वेढले आहे. आज (बुधवार) सकाळ पासून गंगापूर धरणातून दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे गंगापूर रस्त्यावरील गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधब्याला देखील पुराच्या पाण्याने वेढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. nashik-rain-update-godawari-flooded-someshwar-waterfall-sml80

टप्प्याटप्य्याने पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाणार असल्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे गोदावरीत पाणी वाढेल. परिणामी जिल्ह्या प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान सोमेश्वर येथील धबधब्याचे रौद्र रूप पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली हाेती. त्या अनुषंगाने नागरिकांनी धबधबा परिसर तसेच नदी काठी पूर पाहण्यासाठी येऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गाेदावरी नदी परिसर तसेच धबधबा परिसर येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

SCROLL FOR NEXT