Bhujbal Mahajan controversy Nashik roads saam tv
महाराष्ट्र

खड्ड्यांवरून नाशिकमध्ये राजकारण तापलं, भुजबळांनी कुंभमेळा मंत्री महाजनांना सुनावलं

Deadly Roads in Nashik: कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू असलेल्या नाशिकमध्ये रस्त्यांची धूळधाण झालीये. नागरिकांना रस्त्यांवरून चालणं कठीण झालंय. इतकंच नव्हे तर हेच रस्ते नाशिककरांना मृत्यूच्या दाढेत ढकलताहेत. नाशिक जिल्ह्यातून चार-चार नेते राज्याच्या मंत्रीपदी बसलेले असताना शहराची अवस्था अतिशय वाईट झालीये... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

नाशिकमधील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 नाशिककरांनी आपला जीव गमवावा लागलाय. याच खड्ड्यांमुळे नाशिक शहर महानगरपालिकेत राजकीय वातावरण तापलंय. खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेना आणि शिंदेसेना महापालिकेत एकमेकांविरोधात आक्रमक झालेत. त्यातच महायुतीमध्येही नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांनी मंत्री गिरीश महाजनांना सुनावलंय. एव्हंढच नाहीतर शहरातील बजबजपुरीसंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही भुजबळांनी दिलाय. तर भुजबळांच्या इशाऱ्यानंतर पुढील 6 महिन्यांत रस्त्यांची कामं पूर्ण करणार असल्याचं गिऱीश महाजनांनी सांगितलंय.

इतकंच नव्हे तर नाशिकमधील विकासकामं नागरिकांच्या जीवावर उठली आहे. नाशिक जिल्ह्यातून एक, दोन नव्हे तर चार नेते राज्याच्या मंत्रिमंडळात बसलेले आहेत. मात्र नाशिकच्या नागरी समस्यांकडे कुणाचंही लक्ष नाहीये. नाशिक जिल्ह्यात कोणते मंत्री आहेत ते पाहूयात...

गिरीश महाजन

जलसंपदा मंत्री

कुंभ मेळ्याची जबाबदारी

छगन भुजबळ

आमदार, येवला

अन्न व नागरीपुरवठामंत्री

दादा भुसे

आमदार, मालेगाव ग्रामीण

शालेय शिक्षणमंत्री

नरहरी झिरवळ

आमदार, दिंडोरी

अन्न व औषध प्रशासनमंत्री

मात्र खडड्यांच्या मुद्यावर केवळ एकट्या भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतलीय. विशेष म्हणजे यावर तोडगा न काढल्यास थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा भुजबळांनी दिलाय.

आधीच नाशिकमधल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं जाळं आहे...त्यात कुंभमेळ्याच्या कामांसाठी अनेक रस्त्य्यांवर खोदकामे सुरू आहे. मात्र हे सारं नाशिकरांच्या जीवावर उठलंय आणि पाच जणांचा बळी गेला. त्यामुळे आतातरी योग्य व्यवस्थापनातून शहरामधील खड्डे, रस्त्यांची दुरुस्ती आणि कुंभमेळाच्या कामांतून सर्वसामान्यांची सुटका होणार का, याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परवानगी १४ ची, बांधले २१ मजले! केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे; बिल्डर आणि अधिकाऱ्यांची अशी झाली पोलखोल

Fennel Seeds : कच्ची की भाजलेली बडीशेप? आरोग्यासाठी कोणती अधिक योग्य?

बदली एक्सप्रेस सुसाट! 6 IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला; 45 लाखांची लाच घेताना बड्या सरकारी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडला

SCROLL FOR NEXT